डेबिट कार्डचा डेटा क्लोनिंग करून 94 हजारांची फसवणूक

0
220

पिंपळे गुरव, दि.०४(पीसीबी) : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या खात्यातून परस्पर 94 हजार 500 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. ही घटना डिसेंबर महिन्यात लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टोरंटमध्ये घडली.

उमेश देविदास अन्वेकर (वय 35, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी वेटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 4 ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. फिर्यादी अन्वेकर लांडेवाडी चौकातील मधुबन हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल देण्यासाठी फिर्यादी यांनी डेबिट कार्ड दिले. अनोळखी आरोपी वेटरने फिर्यादी आणि हॉटेलमधील अन्य ग्राहकांची डेबिट कार्ड घेऊन डेटा क्लोन केला.

डेटा क्लोनिंग करून अनोळखी वेटरने फिर्यादी यांच्या खात्यातून 50 हजार, बाळासाहेब गणपतराव नजन यांच्या खात्यातून 25 हजार, प्रवीण बापू सोनार यांच्या खात्यातून 19 हजार 500 रुपये असे एकूण 94 हजार 500 रुपये चोरून फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.