डेनिस मुक्वेगे, नादिया मुराद यांना शांततेचे नोबेल पुरस्कार जाहीर

0
488

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – डेनिस मुक्वेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद या दोघांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार आज (शुक्रवार) जाहीर  करण्यात आला आहे. युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे, यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नॉर्वेच्या नोबेल समितीने मुक्वेगे आणि मुराद यांची निवड केली. 

यंदा या पुरस्कारासाठी २१६ लोक आणि ११५ संघटनांना नामांकन देण्यात आले होते. डिसेंबरमध्ये विशेष कार्यक्रमात या दोघांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  या वर्षी या पुरस्कारासाठी ३१ लोकांना नामांकन देण्यात आले होते. या पुरस्कारासाठी ज्यांचे नामांकन दिले जाते त्यांचे नाव गुप्त ठेवले जाते. या नामांकनामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन आणि पोप फ्रान्सिस यांसारख्यांच्या यांचा समावेश होता.

नोबेलचे पुरस्कर्ते मुक्वेगे यांनी युद्ध प्रसंगी लैंगिक शोषण झालेल्या पीडितांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तर त्यांची सहकारी नादिया मुराद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःवर झालेला आणि दुसऱ्यांवर झालेल्या शोषणाविरोधात लढा दिला आहे.