डी.एस.के यांच्या आलीशान १३ गाड्यांचा निलाव होणार

0
809

पुणे, दि. २३ (पीसीबी) – गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या २० आलीशान वाहनांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

डीएसके यांच्या २० वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी देण्यात यावी, म्हणून विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या कोर्टात आर्थिक गुन्हे शाखेने अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र २० पैकी १३ वाहनांची विक्री निलाव करण्याची परवानगी दिली आहे. या १३ वाहनांची किंमत दोन कोटी ५७ लाख ५० हजार रुपये आहे. यामध्ये बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा या महागड्या वाहनांचा समावेश आहे. तसेच डी.एस.के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करून त्यातील आलेल्या रकमेतून अनेक ठिकाणी मालमत्ता विकत घेतल्या. त्यातील ४८८ मालमत्तांचा शोध घेऊन पोलिसांनी या आगोदरच जप्त केल्या आहेत.