डी.एस.कुलकर्णी यांची कार्यालयात जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने नाकारली

0
424

पुणे, दि. ७ (पीसीबी) – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. डीएसके यांनी केलेली विनंती सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी फेटाळून लावली.

गेल्या ४५ वर्षांचा लेखाजोखा मांडायचा आहे. त्यामुळे कार्यालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती डी. एस. कुलकर्णी यांनी केली होती. मात्र सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी ही विनंती मान्य केली नाही तसेच वकिलामार्फत म्हणणे सादर करण्यास सांगितले. डीएसके यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी गुरुवार (दि.२१) जून ला होणार आहे.

दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी, डी.एस.कुलकर्णी हे न्यायालयानची फसवणूक करत असल्याचे कोर्टाला सांगितले.