डीएसके प्रकरणी महाराष्ट्र बँकेच्या त्या तीन अधिकाऱ्यांना न्यायालयाने वगळले

0
463

पुणे, दि. २१ (पीसीबी) – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपयांचा कर्ज मंजूर केल्याप्रकरणात महाराष्ट्र बँकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी खटल्यातून आज (सोमवारी) वगळले

महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत असे खटल्यातून वगळल्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

डीएसके यांना कर्ज देताना बँक ऑफ महाराष्ट्राने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र शासनाने घालून दिलेले निर्देश, सुचना व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले होते. पण या निष्कर्षातून ज्यांच्यावर कारवाई करायची त्याच व्यक्तींना गुन्ह्यातून वगळण्यची नामुष्की पोलिसांवर आली आहे.