Maharashtra

डान्सबारच्या निषेधार्थ मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंना घुंगरू पाठवणार – फौजिया खान

By PCB Author

January 19, 2019

जळगांव, दि. १९ (पीसीबी) –  डान्सबारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी आज (शनिवार) येथे दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्यांसह फौजिया खान यांनी  जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी  डान्सबारच्या निर्णयासंदर्भात महाराष्ट्र सरकार न्यायालयात भक्कम बाजु मांडण्यात अपयशी ठरले आहे, असा  आरोप  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

दिवंगत आर.आर आबांनी डान्सबार बंद करण्याचा  निर्णय घेतला होता. पण या डान्सबार बंदीबाबत सरकारला न्यायालयात भक्कम बाजु मांडता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली, असे फौजिया खान यांनी सांगितले.  बंदी उठवल्याने राज्यात महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे, असे त्या म्हणाल्या.