Chinchwad

डांगे चौकात विजेच्या डीपीला चिटकून एकाचा मृत्यू

By PCB Author

January 13, 2019

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – डांगे चौकाजवळ बीआरटी रस्त्यालगत असलेल्या एका विजेच्या डीपीला चिटकून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी एकच्या सुमारास समोर आली.

या घटनेत संबंधीत व्यक्ती पूर्णपने जळाली होती. घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन दलाचे जवान आणि वाकड पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून मृत व्यक्तीला विजेच्या डीपीच्या बाहेर काडण्यात आले आहे. मृत व्यक्ती डीपीजवळ काय करत होती हे अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.