डांगे चौकात महिला पोलिस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा; टेम्पो चालकाला अटक

0
1060

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – भर रस्त्यात उभा केलेला टेम्पो बाजुला गेण्यास सांगितल्याने एका टेम्पो चालकाने टेम्पो बाजुला न घेता तो चालु रस्त्यातच उभा केला. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालून सरकारी कामात आडथळा आणल्याने टेम्पो चालकाविरोधात सरकारी कामात आडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेरगावातील डांगे चौकात बुधवारी (दि.२१) रात्री बाराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता जीजाभाऊ गोडे (वय ३०) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार, अनिल फुलचंद थोडसरे (वय २६, रा. मोरयाप्रसाद, बिल्डींग, राममंदीराजवळ, फ्लॅट नं.१०, तीसरा मजला, चिंचवडगाव) या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बाराच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे या थेरगावातील डांगे चौकात कर्तव्य बजावत होत्या. यावेळी डांगे चौकातील वरदळीच्या रस्त्याच्या मदोमद टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच/१२/४००६) उभा होता. यामुळे वाहतुक कोंडी आणि अपघाताची शक्यता होती म्हणून गोडे यांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालक अनिल याला टेम्पो बाजुला घेण्यास सांगितले. मात्र अनिल याने गोडे यांच्याशी हुज्जत घालून टेम्पो भर रस्त्यातच उभा केला. यामुळे चालक अनिल विरोधात सरकारी कामात आडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.