डांगे चौकात झालेल्या ‘त्या’ खुनातील आरोपी सापडला; उस्मानाबादमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
534

चिंचवड, दि.०२ (पीसीबी) : डांगे चौकात गुरुवारी (दि.23) जुन्या भांडणाच्या रागातून खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती वाकड पोलिसांनी आरोपीला उस्मानाबाद येथून उसाच्या शेतातून अटक केली आहे. हजमलंग हुसेनबाशा सिंदखेडे (रा. कोयते वस्ती, पुनावळे मुळगाव तुळजापूर, उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौकात गुरुवारी (दि.23) जुन्या भांडणाच्या रागातून रोहन दिलीप कांबळे (वय 30, लक्ष्मी मंदिराजवळ, चांदणी चौक, धायरी, पूणे ) या इसमाचा खून झाला होता. घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी खुनाचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार वाकड तपास पथकाने तीन वेगवेगळ्या तीन तयार केल्या.

प्राथमिक तपासात हाजमलंग याचे नाव समोर आले. दरम्यान, मयत रोहन कांबळे आणि हजमलंग यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हयातील मुख्य आरोपी हाजमलंग असल्याचे निष्पन्न झाले. हाजमलंग हा मोबाईल वापरत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या.

दरम्यान, हाजमलंग इटकळ, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद येथे रात्रीच्या वेळेस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांनी या भागात सापळा रचून त्याचा उसाच्या शेतात पाठलाग करुन ताब्यात घेतले.