Bhosari

डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी आणि अविरत श्रमदान ग्रुपने काढली इंद्रायणीतील जलपर्णी

By PCB Author

March 23, 2019

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – जागतिक जलदिनानिमित्त डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि अविरत श्रमदान ग्रुपतर्फे मोशी येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली. तसेच स्मशानघाट परिसरातील साफसाफई केली.

जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत डब्ल्युटीईच्या ९० कर्मचाऱ्यांसह अविरत श्रमदान ग्रुपचे डॉ. निलेश लोंढे सहभागी झाले होते. जंगलतोड, वाढते शहरीकरण आणि निसर्गामधील अवाजवी मानवी हस्तक्षेप यांमुळे जलचक्रात अनियमितता येत आहे. मानवासमोर भीषण समस्या म्हणून जलसमस्या उभी आहे. त्यामुळे सर्वत्र स्वच्छता राखा असा संदेश यावेळी देण्यात आला.