ठाण्यात मुलीवर अत्याचार करणाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

0
376

ठाणे, दि. ८ (पीसीबी) – ठाण्यात  अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर नागरिकांनी नराधमाला चोप दिला, मात्र तिथून हा नराधम पळून गेला होता. आज (सोमवारी) ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी या नराधमाला पत्रकार परिषदेत आणले. हा नराधम मूळचा बिहारचा असून त्याने यापूर्वीही ठाण्यात तीन लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

अविनाश जाधव आणि मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतच त्या नराधमाला चोपले. त्याला पत्रकार परिषदेत माफी देखील मागायला लावली. ‘नवी मुंबई, मुंबई किंवा ठाणे या तिन्ही शहरांमधील लहान मुलींवर बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी हे उत्तर भारतीय आहेत. हे सत्य असून गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. अशा किती लोकांना सहन करायचे. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.