Maharashtra

ठाकरे सरकार येत्या ११४ दिवसांत कोसळेल – नारायण राणे

By PCB Author

February 24, 2020

मुंबई,दि.२४(पीसीबी) – भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्धाटन भाजप खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी “हे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल” असं भाकित केलं आहे.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. पण हे सरकार येत्या ११ दिवसांत कोसळेल, असं भाकित नारायण राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील सरकार आज पडेल की उद्या पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. ११ दिवसांत सरकार पडेल. तसेच सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असंही ते म्हणाले आहेत.