Maharashtra

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण; चिंतेत वाढ

By PCB Author

September 24, 2020

मुंबई,दि.२४(पीसीबी) – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर करोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020