ठाकरे यांनी मानले सलमान खानचे आभार

0
354

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु या काळात देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातली कर्मचारी जीवाची परवा न करता काम करत आहेत. त्यामुळे अभिनेता सलामान खानने मुंबई पोलिसांमध्ये सॅनिटायझरचं वाटप केलं. त्याचा हा स्तुत्य उपक्रम पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
करोनाला हरवायचं असेल तर शारीरिक स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे, हे साऱ्यांनाच ठावूक आहे. हात स्वच्छ ठेवणं हे या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक जण सॅनिटायझर विकत घेण्यावर जोर देत आहे. एकाच वेळी सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात त्याच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे सलमान खानने त्याच्या ‘फ्रेश’ (FRSH) या कंपनीत तयार करण्यात आलेले जवळपास १ लाख सॅनिटायझर पोलिसांमध्ये वाटले. त्याची ही कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानत ‘या कौतुकास्पद पुढाकारासाठी आपले आभार मानतो’, असं म्हटलं आहे.