Maharashtra

ठाकरे मंत्रिमंडळात ४८ तासांत बदल,जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात बदल

By PCB Author

December 14, 2019

मुंबई, दि.१४ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा १५ दिवसानंतर खातेवाटप जाहीर झाला. सहा मंत्र्यांना हे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र विकासआघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या खाते बदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. या बदलानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले आहे.

मंत्रिमंडळ खात्यातील बदल खालीलप्रमाणे
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. @Jayant_R_Patil यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री.@ChhaganCBhujbal यांच्याकडे देण्यात आले आहे. २/२

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019

दरम्यान, करण्यात आलेला खाते विस्तार हा तात्पुरता आहे. त्यात नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बदलणार आहे. मात्र, त्याआधीच दोन मंत्र्यांकडील खाते वाटपात  बदल करण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्याकडे आता जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते देण्यात आले आहे.