Pimpri

‘ट्रेंड मनी’ व्यवसायात पैसे गुंतवण्याचे अमिश दाखवणे आले अंगाशी; ‘त्या’ चौघांवर अखेर गुन्हा दाखल

By PCB Author

January 27, 2021

आकुर्डी, दि. २७ (पीसीबी) – ट्रेंड मनी या व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून त्यातून चांगला परतावा देण्याचे अमिश दाखवून काही लोकांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत हॉटेल सिल्व्हर सेव्हन, आकुर्डी येथे घडली.

मनोज हणमंत सुतार (वय 35, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजकुमार मनोहर सिंग, राहुल हरिशंकर तिवारी (दोघे रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), उत्सव सावंत, संतोष सुतार (रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सुतार आणि अन्य काही जणांना ट्रेड मनी या व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्याचे अमिश दाखवले. तसेच त्यातून चांगला परतावा देण्याचेही आरोपींनी सांगितले. पैसे गुंतवण्यास सांगून चांगला परतावा न देता आरोपींनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.