टी-२० सामन्यात नवा विक्रम; पाकिस्तानच्या मोहम्मद इरफानच्या ४ षटकांत १ धाव

0
1256

पॅरिस,   दि. २६ (पीसीबी) – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला  आहे. इरफान कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस ट्रायडेंट्सकडून खेळत असून सेंट किट्स अँड नेविसविरुद्धच्या सामन्यात इरफानने ४ षटकांत अवघी १ धाव दिली.

डावखुरा गोलंदाज इरफानने सेंट किट्सविरुद्धच्या सामन्यात  चार षटकांत केवळ एक धाव देऊन त्याने दोन बळी टिपले. विशेष म्हणजे स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर ही धाव निघाली. ४ षटकं, ३ निर्धाव, १ धाव आणि २ बळी असा स्पेल इरफानने टाकला. ख्रिस गेल आणि इव्हिन लुइस या दोघांना इरफानने माघारी धाडले.

इरफानच्या भेदक माऱ्यानंतरही बार्बाडोसला पराभवाला सामोरे जावे लागले. बार्बाडोसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १४७ धावा करत विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, हे लक्ष्य सेंट किट्सने १८.५ षटकांत पूर्ण करून विजय मिळवला.