टीव्ही बंद करायची वेळ आली आहे, कारण सर्वच एक्झिट पोल चुकीचे नसणार – ओमर अब्दुल्ला

0
568

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या  टप्प्यातील मतदान रविवारी  पार पडल्यानंतर  मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल  समोर आले आहेत. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून  प्रतिक्रिया दिली आहे.

टीव्ही बंद करायची आणि सोशल मीडियावरून लॉग आऊट वेळ आली आहे. कारण सर्वच एक्झिट पोल चुकीचे असणे शक्य नाही. आता केवळ २३ तारखेची वाट पाहायची, त्यादिवशी पृथ्वी अजूनही आपल्या अक्षावरच फिरत आहे, हे सिद्ध होईल, असे अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार पुन्हा एकदा सत्तेवर  येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  तर निवडणुकीपूर्वी विरोधकांनी एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा दावा केला  होता.  पण, एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत.