टिवटिव करणाऱ्यांचा एनडीएशी संबंध नाही – संजय राऊत

0
441

मुंबई,दि.१८(पीसीबी) – शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नांडीस निमंत्रक होते. फर्नांडीस हे एनडीएतील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. आता एनडीएच्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणं हा निव्वळ योगायोग नसून ते कौर्य आहे, असं म्हणत शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष आहे. कुणाच्या सहीने शिवसेनेला एनडीतून बाहेर काढलं, असा थेट सवालही संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.

शिरोमणी आकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. शिवसेनेला एनडीएबाहेर काढताना बादल यांना विचारलं होतं का?, इतरही अनेक घटक पक्ष आहेत, या सर्व घटक पक्षांना विचारलं कां?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.