Pune

‘टिकटॉकवर ‘मुळशी पॅटर्न’ ची नक्कल करणे पडले महागात’

By PCB Author

December 23, 2019

आळंदी, दि.२३ (पीसीबी) – आळंदीमधील काही स्थानिक तरुणांनी टिकटॉकवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरची नक्कल करणारा व्हिडिओ शूट केला. अनं तरूणांच्या आले आंगलट

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीमधील काही स्थानिक तरुणांनी टिकटॉकवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरची नक्कल करणारा व्हिडिओ शूट केला. यामध्ये त्याच चित्रपटातील संवाद या तरुणांनी वापरले होते. ‘आळंदी पॅटर्न डीव्हाय बॉईज’ नावाने आठ तरुणांने टिकटॉकवर हा व्हिडिओ अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांची नजर या व्हिडिओवर पडली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली. व्हिडिओद्वारे शहरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व तरुण १८ वर्ष वयाचे आहेत. अटक करण्यात आलेल्या आठ पैकी सहा जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.