टायर बदलण्यासाठी उतरले अन् वाढदिवशीच मृत्यूने गाठले

0
702

मावळ, दि.१६ (पीसीबी) – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री ओझर्डे गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. खासगी बसने कारला मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघांतामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतात एका डॉक्टरांचा समावेश असून डॉ. केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. ते पुण्यातील संचेती रूग्णालयात मणक्याचे डॉक्टर होते

रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारला बसनं मागील बाजूनं जोरदार धडक दिली. कारचे पंक्चर झालेलं टायर बदलत असताना ही दुर्घटना घडली. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से टोलनाक्यापासून काही अंतरावर अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की मध्यरात्रीच्या काळोखात 2 किलोमीटर पर्यंत आवाज गेला. या अपघातचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहे.

चेतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील मणक्यांशी संबंधित आजारांचे मुख्य डॉक्टर होते. मुंबई येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून माघारी येताना डॉ. केतन खुर्जेकर यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी ते आपल्या चालकाला मदत करत होते, त्याचवेळेस खासगी बसनं दोघांनाही उडवलं. आज डॉ. केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता, अशी माहिती खुर्जेकर यांचे मामेबंधू पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली आहे.