Pimpri

टपरीचालक महिलेचा विनयभंग

By PCB Author

May 11, 2022

चिखली, दि. ११ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी टपरी बंद करत असताना चहासाठी आलेल्या ग्राहकाला टपरी चालक महिलेने चहा दिला. त्यानंतर ग्राहकाने महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता चेरी चौक, चिखली येथे घडली.

विलास फटांगरे (वय 50, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची चहाची टपरी आहे. सोमवारी रात्री टपरी बंद करत असताना आरोपी टपरीवर आला. त्याने फिर्यादी यांना चहा मागितला. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपीला चहा दिला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लील भाषेत बोलून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.