`झुम` ला पर्याय आला …

0
336

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप जिओ मिट लाँच केलं. त्यानंतर आता दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारती एअरटेल लवकरच झूम, गुगल हँगआउट्स, माइक्रोसॉफ्ट टीम्स आणि जिओ मिटला टक्कर देण्यासाठी एक नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल लाँच करण्याची शक्यता आहे. सुरूवातीला एअरटेलकडून हे अ‍ॅप छोट्या कंपन्यांसाठी ‘पेड’ स्वरुपात आणलं जाईल. म्हणजेच ते मोफत नसेल. अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद बघून कंपनी हे अ‍ॅप सर्व सामान्य ग्राहकांसाठी रोलआउट करेल.

एअरटेलच्या अ‍ॅपमध्ये लेटेस्ट AES 256 इन्क्रिप्शन आणि सिक्युरिटीसाठी अनेक ऑथेंटिकेशन असू शकतात. या अ‍ॅपसाठी उच्चदर्जाच्या सिक्युरिटीवर कंपनी विशेष लक्ष देईल. जिओ मिट प्रमाणे एअरटेलचं अ‍ॅपही सर्व डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. यात मोबाइल आणि डेस्कटॉपचाही समावेश आहे. पण अद्याप एअरटेलकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.