Maharashtra

झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली – आशिष शेलार

By PCB Author

December 15, 2019

मुंबई,दि.१५(पीसीबी) – विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी एक वक्तव्य केलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली “रोखठोक”लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली ,सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली, नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

नाही धार "सच्चाई"कारांच्या शब्दांना आज दिसली
"रोखठोक"लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली
सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली
नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली?
छे..छे..झुकली रे झुकली
मराठी बाणा सांगणारी सेना
सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 15, 2019

सावरकर यांच्याविषयी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद आहेत. इंग्रजांसमोर सावरकर झुकले असं काँग्रेस म्हणते. तर सावरकर हे देशभक्त होते, देशाचे स्वाभिमानी नेते होते, असं शिवसेना म्हणते. या मुद्दावरुन शेलारांनी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकली असं म्हटलं आहे.