Desh

झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक,विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

By PCB Author

December 23, 2019

रांची,दि.२३(पीसीबी) –झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला काँग्रेस आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे

महाराष्ट्रापुरती मर्यादित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झारखंडमध्ये विजयी पताका फडकावली आहे.हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमलेशकुमार सिंग विजयी झाले आहेत. बहुजन समाजवादी पार्टीचे शेर अली त्यांच्या विरोधात मैदानात होते. त्यांना १९ % मते मिळाली आहेत तर कमलेशकुमार सिंग यांना २८.५५% मते मिळाली आहेत. केरळ विधानसभेच्या पोट निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आला होता. आता केरळनंतर झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाते खोलले आहे.

झारखंड विधानसभेत ८१ जागा असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ४२ जागांची गरज आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी ४९ जागांवर आघाडी आहे.