Chinchwad

झाडे तोडण्यासाठी त्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी; पुढे काय झालं वाचा सविस्तर…

By PCB Author

December 21, 2020

ताथवडे, दि. २१ (पीसीबी) -शाळेसमोरील 14 झाडे शाळेच्या आणि महापालिकेच्या परवानगी शिवाय तोडली याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबारा वाजता ताथवडे येथील राजीव बिझनेस स्कूल व दि अकेडमी स्कूल समोर घडली.  राजेश वालिया व त्यांचे सहा कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित भागवत पवार (वय 36, रा. कोथरूड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे ग्रामोदय ट्रस्टची राजीव बिझनेस स्कूल व दि अकेडमी स्कूल आहे. या शाळेच्या गेटसमोर असलेली 14 बिट जातीची झाडे आरोपींनी शाळेच्या आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडली. झाडे कापत असताना फिर्यादी अडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.