झटपट पैसे कमवण्यासाठी केले होते “माही” चे अपहरण; आरोपींना खंडणीच्या पैशातून टाकायचे होते हॉटेल

0
4207

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) –  हॉटेल सुरु करण्यासाठी पैसे हवे होते यामुळे अपहरणकरत्या आरोपींनी माही अवध जैन या १२ वर्षीय मुलीचे चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या बाहेरुन गुरुवारी (दि.१५) सायंकाळी चारच्या सुमारास अपहरण केले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

नितीन सत्यवान गजरमल (वय २५ रा. देवगाव ता. परांडा जि. उस्मानाबाद, सध्या रा. नेरे) त्याचा साथीदार जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१ रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते एका थिअटरमध्ये कामाला होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना झटपट पैसे कमवून हॉटेलचा व्यवसाय सुरु करायचा होता. यामुळे आरोपींना एका श्रीमंत घरातील मुलांचा शोध घेत होते. सुरुवातीला त्यांनी चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीमध्ये आखणी करुन जैन कुटूंबातील माही हिचे अपहरण करण्याचे ठरवले. ते मागील चार ते पाच दिवसांपासून सोसायटीच्या गेट बाहेर माहीवर पाळत ठेऊन होते. गुरुवारी दुपारी माही सोसायटी समोरील मी मार्ट या दुकानात पेन आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपींनी तिचे अपहरण करुन एका सील्वर रंगाच्या ऑपट्रा कारमधून तिला नेरे येथील एक्झरबीया या सोयाटीतील फ्लॅटमध्ये ठेवले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार चाळीस हजार रुपयात ऑनलाईन पध्दतीने विकत घेतली होती. तसेच ज्या ठिकाणी माहिला ठेवण्यात आले होते तो फ्लॅट देखील ऑनलाईन पध्दतीने भाड्याने घेतला होता.

आरोपींनी सुरुवातीला माहीच्या वडिलांकडे ५० लाखांची मागणी केली. तडजोडीनंतर सात लाख खंडणीची रक्कम ठरवण्यात आली. यादरम्यान आरोपींचे लोकेशन वारंवार बदलत होते. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी अतिशय संयम ठेवत माहीला नेरे येथे ठेवलेल्या फ्लॅटचा झडा लावला. त्यानंतर तेथे चौकशी केली असता एका महिलेने पोलिसांना एका मुलीचा रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. इतक्यात दोघा आरोपीतील एकजण इमारतीखाली फोन करण्यासाठी आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि फ्लॅटचा दरवाजा तोडून माहिची सुटका केली.

दरम्यान, जैन कुटूंबासोबत या कठीण परिस्थितीत क्वीन्स टाऊन सोसायटीतील प्रत्येक परिवारसोबत होता. त्यांनी आज (शुक्रवार) पोलिसांचे अभिनंदन देखील केले.

कठीण परिस्थित माहिने दाखवला हुशारपणा…

माहिचे जेव्हा दोघा आरोपींनी अपहरण केले तेव्हा तिने आरोपींना तिचे वय, आई-वडिलांचे उतपन्न कमी सांगितले त्याच बरोबर आरोपींनी तिला खायला दिलेले गुलाबजामून देखील तिने खालले नाही. तसेच ती या परिस्थितीत देखील घाबरली नाही आणि संयम राखला.