ज्वारीच्या किड्यांवरून एकाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

0
250

खेड, दि. २९ (पीसीबी) – घरासमोर ज्वारी वाळवत घातल्याने त्यातील किडे घरात आले. त्यामुळे ज्वारी दुसरीकडे वाळवत घालण्यास सांगणा-या एकाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता खेड तालुक्यातील पाळू येथे घडली.

राजाराम विष्णू आंद्रे (वय 50, रा. पाळू, ता. खेड) यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महादू केदारी, धोंडीबा केदारी, बन्सी महादू केदारी, भिकाबाई महादू केदारी (सर्व रा. पाळू, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची ज्वारी फिर्यादी आंद्रे यांच्या घरासमोर वाळत घातली. त्यामुळे ज्वारीतील किडे आंद्रे यांच्या घरात येऊ लागले. त्यामुळे आंद्रे यांनी आरोपींना त्यांची ज्वारी त्यांच्या घरासमोर वाळत घालण्यास सांगितले. यावरून आरोपी महादू याने काठीने तर भिकाबाई, कोंडीबा, बन्सी यांनी हाताने मारहाण केली. कोंडीबा याने फिर्यादी यांच्या कमरेवर चावा घेतला व शिवीगाळ केली. यामध्ये आंद्रे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.