Desh

ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारी यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

By PCB Author

November 28, 2018

श्रीनगर, दि. २८ (पीसीबी) – जम्मू आणि काश्मीरचे ज्येष्ठ पत्रकार सुजात बुखारी यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला कुथपुरा गावामधील चकमकी सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले आहे.

नावीद जट्ट, असे या दहशतवाद्याचे नाव असून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो कमांडर होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावीद जट्ट हा ६ फेब्रुवारीला पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. तेंव्हापासूनच सैनिक त्याचा तपास करत होते. त्यावेळी चकमकीत एका पोलिसाचाही मृत्यू झाला होता. जट्ट हा पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. ‘राईजिंग काश्मीर’ या इंग्रजी दैनिकाचे संपादक सुजात बुखारी यांची हत्या करण्याचाही त्याच्यावर आरोप होता.