Maharashtra

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची बिल्डरकडून फसवणूक

By PCB Author

September 25, 2018

विरार, दि. २५ (पीसीबी) –  ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विरारमधील बिल्डरकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात त्यांनी दोन प्लॅट खरेदी केले होते. मात्र बिल्डरने एकच प्लॅट अनुराधा पौडवाल यांच्यासह दोन ते तीन जणांना विकून फसवणूक केली.

याप्रकरणी अनुराधा पौडवाल यांनी सोमवार (दि.२४) अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मंदार असोसिएट या कंपनीतील अविनाश डोले, राजीव सुलेरी यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर फसवणूकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी विरारमधील मंदार असोसिएट या बिल्डरकडून  विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात दोन प्लॅट खरेदी केले होते. मात्र बिल्डरने एकच प्लॅट अनुराधा पौडवाल यांच्यासह दोन ते तीन जणांना विकून फसवणूक केली. या बिल्डर्सने आतापर्यंत नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत विरारमधील अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीने जर आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.