ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

0
1244

पुणे, दि. ९ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग (वय ७९) यांचे आज (शुक्रवार) सकाळी वृद्धापकाळाने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कमला, गिधाडे, सखाराम बाइंडर यासारख्या अनेक नाटकात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.

रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटकातल्या भूमिका गाजल्या. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’या चित्रपटांत तसेच ‘रथचक्र’या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. बंडखोर अभिनेत्री अशी लालन सारंग यांची ओळख होती.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (दि.१० नोव्हेंबर) सकाळी ७ ते ७.३० या वेळात बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे ठेवण्यात येईल.आणि अंत्यविधी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी,मुंबई येथे होतील.’