Notifications

ज्या मुलाचा सत्कार केला, त्याने कसोटी पदार्पणात शतक केल्याचा आनंद – अजित पवार

By PCB Author

October 05, 2018

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याच्या या कामगिरीचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. त्याच्यासोबतचा जुना फोटो शेअर करून त्याचे कौतुक केले आहे.