‘ज्याला जसं आवडतं तसं त्यानं जगावं, निकच्या शर्टलेस फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली प्रियांका

0
657

न्यूयॉर्क, दि. १४ (पीसीबी)-  बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या मायामी व्हेकेशनपासून चांगलीच चर्चेत आहे. सुट्ट्यांमध्ये सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी केलेली टीका यामुळे तिच्या डोक्याला ताप झाला. आता पती निक जोनासने त्याचा शर्टलेस फोटो पोस्ट केल्यानंतर त्यालाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्यामुळे प्रियांका नेटकऱ्यांवर चांगलीच भडकली आहे.

निकचा शर्टलेस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी निकच्या बॉडीवर टिप्पणी केली आहे. आता तुझे बाबा होण्याचे वय झाले आहे, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे. यावर प्रियाकांना एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे. ”ज्याला जसे आवडते तसे त्याने जगावे, अशा मताचे आम्ही दोघे आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असेल तर God Save Us,” अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.

”लोकांनी काहीही म्हटले तरी माझ्यावर त्याचा फरक पडत नाही. आता लोकांना निकच्या शरीरावरही मते व्यक्त करायची असतील तर देवच आमचे रक्षण करो,” असे ती पुढे म्हणाली.