ज्यांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली, तेच चौकशी समितीवर – उद्धव ठाकरे

539

मुंबई, दि. १० (पीसीबी) – अवनी वाघिणीची शिकार नियमानुसार केली का नाही? याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती एक फार्स आहे. ज्या लोकांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर घेण्यात आले आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत समिती नियुक्त करून  या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.