Maharashtra

ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ब्रेल लिपीत रूपांतर

By PCB Author

August 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सकारात्मक ज्ञानाचा स्रोत असलेल्या ज्ञानेश्वरीचे ज्ञान अंध बांधवांना व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे ब्रेल लिपीत रूपांतर करण्यात आले आहे. हा अनोखा उपक्रम ‘दि ब्लाईंड वेलफेअर ऑर्गनायझेशनने हाती घेतला आहे. आज शिवसेनाभवनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा पार पडला.

जीवनाचे सार सोप्या भाषेत समजावणाऱ्या ज्ञानेश्वरीचे वाचन अंधबांधवांना करता यावे, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चार अध्याय ब्रेल लिपीत रूपांतरित करण्यात आले आहेत.

रोजच्या आयुष्यातील नैराश्य दूर करून संतांचे विचार आचरणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याने, अंधबांधवांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकता आहे. त्याचे वाचन सोयिस्कर करता यावे यासाठी पहिले तीन अध्याय शंभर पानी आणि अठरावा अध्याय ८० पानी केला आहे.