Pimpri

ज्ञानप्रबोधिनीची कौतुकास्पद कामगिरी

By PCB Author

May 13, 2021

निगडी, दि.१३ (पीसीबी) : सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ हा उपक्रम हाती घेतला आहे! टेलिमेडिसिन – फोन वरून डॉक्टरांचा सल्ला, रक्त-प्लाज्मा, घरपोच जेवणाचा डबा, औषधे पोहोचविणे अशा विविध पातळीवर कार्य सुरु आहे.

यासाठी एक सेवावाहिनी – 8390458155 – सकाळी ९ ते रात्री ८ सुरु करत आहोत… यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला जरूर फोन करा 👉

📌 घरबसल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला – Allopathy बरोबरच आयुर्वेदिक, होमिओपॅथी सुद्धा. 📌 मानस आरोग्य सल्ला, 📌 योग मार्गदर्शन 📌 व्यायाम मार्गदर्शन – physiotherapy 📌 Home Sanitization (सशुल्क) 📌 रक्ताची/प्लाझ्माची गरज असल्यास. 📌 गृह विलगीकरणामुळे जेवणाचा डबा किंवा औषधे घरपोच हवे असल्यास ( घरपोच देण्याचे शुल्क नाही औषधांचे जे असेल ते शुल्क असेल. कोरोना रुग्णांसाठी डबा मोफत आणि बाकीच्यांना माफक शुल्कात) या गुगल फॉर्मवर सुद्धा आपण काय मदत पाहिजे हे सांगू शकता http://bit.ly/jpnv-covid-helpseeker

केवळ मन मोकळं करायला आणि गप्पा मारायला सुद्धा फोन करू शकता.

सामाजिक बांधिलकी म्हणून ज्ञान प्रबोधिनी संस्था आपत्तीकाळात आपल्या सर्वांच्याबरोबर आहे.

ज्ञान प्रबोधिनी निगडी परिवार🙏🏼