ज्ञानप्रबोधिनीची कौतुकास्पद कामगिरी

0
217

निगडी, दि.१३ (पीसीबी) : सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी, ज्ञानप्रबोधिनी परिवाराने कोविड मदतकार्य २०२१ हा उपक्रम हाती घेतला आहे! टेलिमेडिसिन – फोन वरून डॉक्टरांचा सल्ला, रक्त-प्लाज्मा, घरपोच जेवणाचा डबा, औषधे पोहोचविणे अशा विविध पातळीवर कार्य सुरु आहे.

यासाठी एक सेवावाहिनी – 8390458155 – सकाळी ९ ते रात्री ८ सुरु करत आहोत… यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला जरूर फोन करा 👉

📌 घरबसल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला – Allopathy बरोबरच आयुर्वेदिक, होमिओपॅथी सुद्धा.
📌 मानस आरोग्य सल्ला,
📌 योग मार्गदर्शन
📌 व्यायाम मार्गदर्शन – physiotherapy
📌 Home Sanitization (सशुल्क)
📌 रक्ताची/प्लाझ्माची गरज असल्यास.
📌 गृह विलगीकरणामुळे जेवणाचा डबा किंवा औषधे घरपोच हवे असल्यास ( घरपोच देण्याचे शुल्क नाही औषधांचे जे असेल ते शुल्क असेल. कोरोना रुग्णांसाठी डबा मोफत आणि बाकीच्यांना माफक शुल्कात)
या गुगल फॉर्मवर सुद्धा आपण काय मदत पाहिजे हे सांगू शकता
http://bit.ly/jpnv-covid-helpseeker

केवळ मन मोकळं करायला आणि गप्पा मारायला सुद्धा फोन करू शकता.

सामाजिक बांधिलकी म्हणून ज्ञान प्रबोधिनी संस्था आपत्तीकाळात आपल्या सर्वांच्याबरोबर आहे.

ज्ञान प्रबोधिनी निगडी परिवार🙏🏼