“जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत”

0
335

मुंबई, दि.२४(पीसीबी) – कोरण रुग्णांबद्दलचा जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

सव्वा ते दीड लाख रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस असतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होतो. दरम्यान 47 हजार 190 ही करोना रुग्ण संख्या असली तरीही 33 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. उर्वरित 13 हजारांच्या आसपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये न पाहिलेली ही परिस्थिती आहे. मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की कोरोनाचं संकट नष्ट होवो अशी दुवा मागा. लॉकडाउन केला आणि आपण त्यातून काय साधलं याची कल्पना देतो. काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.