Entertainment

जॉन अब्राहमला ‘सत्यमेव जयते 2’ च्या सेटवर दुखापत; तात्पुरतं ‘चित्रीकरण थांबवलं

By PCB Author

December 25, 2020

वाराणसी, दि.२५ (पीसीबी) : ‘सत्यमेव जयते 2’ च्या सेटवर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला दुखापत झाली आहे. सध्या वाराणसीत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून एक अॅक्शन सीन करत असताना त्याला दुखापत झाल्याने चित्रीकरणदेखील अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ चं लखनौमध्ये चित्रीकरण सुरु झाल्यानंतर हे चित्रीकरण पार पडल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम पुढील चित्रीकरणासाठी वाराणसीत दाखल झाली होती. मात्र, पहिल्याच दिवशी जॉनला दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आलं आहे. चेत सिंह किल्ल्याजवळ जॉन अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे जॉनला दुखापत झाल्याचं कळताच लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत आहेत. तर या चित्रपटामध्ये अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.