Desh

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात पकडले

By PCB Author

February 22, 2019

लखनऊ, दि. २२ (पीसीबी)-  उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

शाहनवाझ अहमद तेली आणि आकिब अशी या संशयित देवबंदस्थित एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांना देवबंद येथील वसतिगृहातून अटक केली आहे. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. शाहनवाझ जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा आहे, तर आकिब हा पुलवामातील रहिवासी आहे. सूत्रांनुसार, ब्रेन वॉश करून ‘जैश’ या दहशतवादी संघटनेत भरती करता येतील, अशा तरुणांच्या शोधात हे दोघे उत्तर प्रदेशात आले होते. याआधीही ते अनेकदा देवबंद आणि राज्यातील इतर भागात आले होते. आकिब पहिल्यांदा जानेवारीत एटीएसच्या रडारवर आला.

एटीएसच्या माहितीनुसार, या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’शी संबंधित व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. त्यांचा संबंध ‘जैश’शी असू शकतो, असा एटीएसला संशय आहे. शाहनवाझच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येऊ शकते. तसंच पुलवामा हल्लाप्रकरणी तपास करणाऱ्या संस्थांनाही त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होऊ शकतो, असंही सांगण्यात येत आहे.