जैवइंधनावरील वाहनांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही- नितीन गडकरी

440

नागपूर, दि. १५ (पीसीबी) – पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक व जैवइंधनावरील वाहनांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. सरकारने इलेक्ट्रिक वाहन, इथेनॉल, सीएनजी आणि मिथेनॉलसह इतर जैवइंधनावर चालणाऱ्या वाहनांना परवान्यापासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांना परवान्याची गरज नाही, असे स्पष्ट करून गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची बचत होण्याचा दावा केला.