जे पनीरची भाजी पाहून नाक मुरडतात त्यांनी पनीर खाण्याचे ‘हे’ फायदे नक्की वाचा

0
418

पनीर म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत तर नुसतं पनीरचे नाव ऐकूनच काहींच्या तोंडची चव निघून जाते. कारण त्यांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नसतात. मात्र,क्वचितच पनीर हा काहीवेळेस अपवाद ठरतो. काही वेळेस काहींना आपल्या सॅलेडमध्ये पनीर घालून खाणे खूप आवडते. कारण त्यामुळे त्या पदार्थाची चव दुप्पट वाढते. आजकाल स्टार्टसमध्येदेखील पनीरचे विविध प्रकार सुद्धा मिळतात. त्यामुळे पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. पनीर हा फक्त जिभेलाच नाही तर आपल्या आरोग्याला सुद्धा आवडत असलेला पदार्थ आहे. त्यामुळे ज्यांना पनीर आवडत नाही त्यांनी शेवट पर्यंत पनीरचे फायदे काय आहेत ते वाचाच….

१. पनीरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते.

२. पनीर मधून शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा मुबलक प्रमाणात होत असतो.

 

३. ज्यांना सारखी भूक लागते त्यांनी पनीर चे सेवन केले तर भुकेवर नियंत्रण राहते.

४. पनीरमुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

 

५. शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास पनीर उत्तमरीत्या मदत करते.

६. दुग्धजन्य असल्याने घातक आजारांपासून बचाव करण्यासाठी पनीर फायदेशीर असते.

७. पनीर दुग्धजन्य पदार्थ असल्याने दात बळकट राहतात.

तरी देखील वरील फायदे वाचल्यानंतर एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण पनीरचे हे फायदे जरी असले तरी प्रत्येकाची अंतर्गत शरीर रचना वेगवेगळी असल्याने या फायद्यांचा लाभ सर्वांनाच होईल असं नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.