जेलमधल्या चपात्या कोर्टात दाखवून कैद्याने घेतली घरच्या जेवणाची परवानगी

0
2490

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ड्रग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने जेलमधल्या जेवणाचा दर्जा किती खालावलेला आहे हे दाखवण्यासाठी जेलमधील चपात्या थेट कोर्टात आणून न्यायाधीशांना दाखवल्या.

साजिद इलेक्ट्रिकवाला असे या कैद्याचे नाव आहे.

साजिदने न्यायाधीशांना चपात्या दाखवून, ‘मला डॉक्टरांनी प्रोटीनयुक्त पोषक आहार खाण्यास सांगितले आहे, पण इतक्या खराब चापात्या खाऊन मला प्रोटीन कसे मिळणार ? याची गुणवत्ता कशी आहे, हे तुम्हीच पाहू शकता’ असे न्यायाधीशांना विचारले. त्यानंतर चपात्या पाहून न्यायालयानेही चपात्यांचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत आणि कैदी चाळीशीत असल्याचा विचार करून त्याला घरी बनवलेले जेवण मिळण्याची परवानगी दिली. आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीने खाण्यायोग्य दर्जा या चपात्या नसल्याचे न्यायालयाने म्हटले आणि त्याला ६ महिन्यांपर्यंत घरी बनवलेले जेवण देण्याची परवानगी दिली.