जेट एअरवेजचे विमान उडवून देण्याची धमकी; प्रवाशाला अटक

0
632

कोलकाता, दि. २६ (पीसीबी) – जेट एअरवेजमधील एका प्रवाशाने टेक-ऑफ करताना विमान उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. जे. पोद्दार असे या प्रवाशाचे नाव असून तो जेट एअरवेजच्या कोलकाता-मुंबई फ्लाईटमधून प्रवास करत होता.

पोद्दारने विमान टेक-ऑफ करताना फोनवर बोलून विमान उडवून देण्याची धमकी दिली. पोद्दारचा चेहरा काळ्या रंगाच्या कपड्याने झाकला होता. आपल्या सीटसमोर उभे राहून पोद्दारने फोनवर बोलताना विमान उडवण्याची धमकी दिली. केबिन क्रूने या घटनेची माहिती तत्काळ वैमानिकाला दिली. यानंतर वैमानिकाने लगेच विमान डमडम विमानतळाकडे परत वळवले. दरम्यान, कोलकाता विमानतळावर सीआयएसएफने पोद्दारला ताब्यात घेतले आहे.