Desh

जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करा…मोदींच्या नावावर देखील काहीतरी असायला हवे – खासदार हंस राज

By PCB Author

August 18, 2019

दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – भाजप खासदार हंस राज हंस त्यांच्या एका विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आलेत. दिल्लीतील प्रख्यात जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचे नाव बदलण्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. “जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे…मोदींच्या नावावर देखील काहीतरी असावे” असे विधान हंस राज हंस यांनी केले.

शनिवारी (दि.१७) विद्यार्थी संघटना अभाविपने आयोजित केलेल्या ‘एक शाम शहीदों के नाम’ या कार्यक्रमात हंस राज हंस सहभागी झाले होते. यावेळी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबत मत व्यक्त करताना केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आणि काश्मीरचा आता झपाट्याने विकास होईल असे म्हटले. आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आम्ही भोगतोय असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, १९६९ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या नावावरुन जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र हंस राज हंस यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.