जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात बस दरीत कोसळली; दहा प्रवासी जखमी

0
403

खोपोली, दि. ५ (पीसीबी) – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ गुरूवारी (दि.५) रात्री उशिरा एक खासगी बस ३० ते ४० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये ४० प्रवासी होते.

सुदैवाने बस दरीत एका झाडात अडकल्याने मोठा अपघात झाला नाही. १० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, बस झाडात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.