Notifications

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By PCB Author

August 01, 2019

शेलारवाडी, दि. १ (पीसीबी) – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उशीरा दिडच्या सुमारास शेलारवाडी येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घडली.

सुरज देवीदास कदम (वय २३, रा. शिवाजीनगर, दत्तमंदिर मागे, देहुरोड) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धिरज देवीदास कदम (वय २१, रा. शिवाजीनगर, दत्तमंदिर मागे, देहुरोड) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा सुरज हा शेलारवाडी येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पायी चालला होता. यावेळी भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्याला जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुरज याचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी वाहनचालक वाहनासह फरार झाला. देहुरोड पोलिस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.