जुन्नरमध्ये वीज कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

0
597

भोरवाडी, दि. १६ (पीसीबी) – जुन्नर तालुक्यातील भोरवाडीमध्ये अंगावर वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडली.

महेश दशरथ भोर असे वीज अंगावर पडुन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री महेश हा त्यांच्या घरा शेजारील झोपडीत झोपला होता. आज पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु झाल्याने महेश झोपडीतून घरात झोपण्यासाठी जात होता. यावेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या हवामान खात्याने राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आज महेश याच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.