Pune Gramin

जुन्नरमध्ये दोन बिबटे विहिरीत पडले; वनविभागाकडून बिबट्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

By PCB Author

March 08, 2019

पुणे, दि. ८ (पीसीबी) – जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे गुरुवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास २ बिबटे विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यांना बाहेर काढण्यासाठी वनविभाग आणि माणिकडोह बिबटे निवारा केंद्रातली बचाव पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून खेड, आंबेगावसह जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्या शिकारीच्या हेतुने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याच शिकारीच्या मागे धावत असताना हे बिबटे विहिरीत पडले आहेत. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेले हे बिबटे भटकळवाडी येथील जालिंदर लांडे यांच्या विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहे.