Pune

जुने फर्निचर स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने तरुणाची दीड लाखांची फसवणूक

By PCB Author

April 06, 2022

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) – जुने फर्निचर स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने एका इसमाने तरुणाची एक लाख 48 हजारांची फसवणूक केली. ही घटना 30 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.

निखिल भानुदासराव गारड (वय 29, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8260317625 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने फिर्यादी तरुणाला फर्निचर स्वस्तात विकत देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून विविध पेमेंट मोडेलद्वारे पैसे घेऊन फर्निचर न देता एक लाख 48 हजार 996 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.